मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने लाखों शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार
देशभरात दसरा हा सण मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत असून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दरम्यान आज आपल्या राज्यात देखील विविध कार्यक्रम होत आहे.तर ज्या दिवसाची राज्यातील शिवसैनिक आतुरतेने वाट पाहतो.तो दिवस म्हणजे दसरा सण या सणाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येत असतात.तर यंदा देखील शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आज सकाळपासूनच आझाद मैदान येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे हे हडपसर येथून हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांसोबत मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे.
‘हे जगदंबे,साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री कर’, या आशयाचे पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी लावले फ्लेक्स
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यभरात बैठका,दौरे आणि सभा घेतल्या जात आहे.तर येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच दरम्यान शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी ‘हे जगदंबे,साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री कर’ अशा आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स शहरातील विविध भागात लावले आहे.तर या फ्लेक्सची शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहण्यास मिळत आहे.