महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प महायुती सरकारच्या नेतृत्वात अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांनी सादर केला. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे पुणे शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे,
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की, या अर्थसंकल्पात पुण्यासाठी भरीव निधी देत विशेष लक्ष केंद्रित केले. यामध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ₹८३७ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, या तरतुदीमुळे शहरातील मेट्रोच्या कामांना वेग येईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच, मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी २३० कोटी रुपयांच्यानिधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे नदी प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल.
पुणे शहराच्या पाणीपुरवठा आणि मलिनिसरण व्यवस्थापनेसाठी अनुक्रमे १३२१ कोटी रु. आणि ८१२ कोटी रु. निधी दिला असून, त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ८ नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी ९९२ कोटी रु. निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही भरीव तरतुदी करण्यात आली असून, शिक्षणासाठी ४६८ कोटी रु. आणि आरोग्यासाठी ५०५ कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील.
तसेच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती प्रकल्प, वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना, सिंहगड रोड उड्डाणपूल आणि नदी पुनर्जीवन प्रकल्प, श्वान प्रेमींसाठी डॉग पार्क उभारणी, फेरीवाल्यांसाठी हॉकर्स प्लाझा असे महत्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत.
या सर्व तरतुदींमुळे पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचा विकास निश्चितपणे वेगाने होईल असे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.