मुंबईतील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
मुंबई
जर एकजुटीने बरोबर राहिलात आपलं सरकार आणणार आहोत अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केली. तसंच एकनाथ शिंदेंवर त्यांनी जोरदार टीका केली. अक्षय शिंदे या बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या भाषणात केला.तसंच आनंद दिघेंचं नाव घेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.
तसेच ते पुढे म्हणाले की,एकीकडे अब्दाली सारखी माणसं आहेत. पण त्यांना कल्पना नाही की ही शिवसेना आहे. जनता ही वाघनखं आहेत. सगळं ओरबाडून घेतल्यानंतरही जनता आई जगदंबेप्रमाणे माझ्याबरोबर राहिली आहे. त्यामुळे मला दिल्लीश्वरांची पर्वा नाही. अब्दालींसारख्यांची कितीही आक्रमण होऊदेत त्यांच्या छातीत भगवा गाडून मी उभा राहण्याची माझी तयारी आहे. इथला शिवसैनिक मशाल बनवून सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले की,रोज माझा महाराष्ट्र लुटला जातो आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या देशात चारच जाती आहेत. गरीब, शेतकरी आणि काय तरी त्यांनी सांगितलं, कुणासाठी काम केलंत ते सांगा? या सरकारने राज्याची आणि मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी केली. मला एक माणूस दाखवा यांच्या मित्रांखेरीज की जो समाधानी आहे. ही निवडणूक फक्त उद्धव ठाकरेंची नाही. चंद्रचूड म्हणाले ना की इतिहासात माझी काय दखल घेतली जाईल? जर इतिहासात तुम्हाला तुमचं नाव अभिमानाने घेतलं जावं असं वाटत असेल तर लोकशाही वाचवा असंही आवाहान उद्धव ठाकरेंनी केलं.