मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला सकाळी दहा वाजता अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे.
या मोर्चाचे संयोजन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांनी केले असून, मोर्चासाठी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर, अंकुश कदम यांच्यासह आजी माजी पदाधिकारी मोर्चात सहभागी होणार आहेत.
सोयाबीनला सरासरी ₹8,500 प्रति क्विंटल, कापसाला सरासरी ₹11,000 प्रति क्विंटल आणि ऊसाला प्रति टन ₹3,500 दर देण्यात यावा.अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानाची भरपाई 72 तासांत तातडीने वितरण करण्यात यावी, ज्याचे आश्वासन शासनाने दिले होते.नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, कारण या शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले आहे.ज्या शेतकऱ्यांची घरे पडली आहेत, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेनुसार ₹3 लाख रक्कम तातडीने मिळावी.बैल, म्हैस किंवा इतर प्राण्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यासाठी तातडीने मोबदला दिला जावा.ज्या शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य व अनुदान तातडीने दिले जावे.ज्या भागात पाणी साठते, तेथे उंच पुलांची बांधणी करण्यात यावी.100% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करण्यात यावे. ज्या शेतकरी बांधवांच्या घरी लग्न ठरलेले आहे, अशा शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च कन्यादान योजनेतून शासनाने उचलावा.100% नुकसान झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने परीक्षा शुल्क माफ करावे आणि प्रवेश शुल्क परत करावे.नुकसान भरपाई बँक खात्यात जमा झाली आहे, परंतु बँकांनी खाते होल्ड केले आहे. हे होल त्वरित उठवण्यात यावे.शेतकर्यांच्या या मागण्यांसाठी उद्या नांदेड येथे मोर्चा काढला जाणार आहे.