महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन

0
20

पुणे

मागील काही महिन्यांपासून महिला,लहान मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहे.या अन्याय अत्याचाराच्या घटना विरोधात राज्यभरात विविध संघटनामार्फत आंदोलन करण्यात येत आहे.त्याच दरम्यान आज पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘वध तीनतोंडी रावणाचा,लढा स्त्री सन्मानाचा’ या आशयाचे मजकूर असलेले फलक हाती घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.तर हे फलक मेणबत्तीने पेटवून महिलांनी निषेध नोंदविला.
तर या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो होते.राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत हे फलक मेणबत्तीने पेटवून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की,राज्यातील अनेक भागात दररोज प्रत्येक क्षणाला महिला,लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत.तसेच शाळा,महाविद्यालय परिसरात रोडरोमिओकडून मुलींना काही तरुण वर्ग त्रास देण्याच्या घटना घडत आहे.या सर्व घटना लक्षात घेतल्यावर राज्यातील महिला,मुलीं सुरक्षित नाही आणि दुसर्‍या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे,बैठका घेत आहेत.या सरकारला कोणाचेही काही देणेघेणे नाही.हे असंवेदनशील सरकार आहे.त्यामुळे हे सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे,तसेच अन्याय अत्याचार करणार्‍या नराधमांना तातडीने शिक्षा करावी,अशी आमची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here