भाजपकडून माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची कसबा समन्वयक पदी निवड

0
40

 

पुण्यातील गणेश बिडकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मात्र त्या पूर्वी महायुती आणि महा विकास आघाडी कडून बैठका,सभा आणि रॅली आयोजित करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.तर प्रत्येक नेत्यांकड मतदार संघ निहाय जबाबदारी देखील देण्यात येत आहे.त्याच दरम्यान पुणे शहरातील नेहमीच चर्चेत राहिलेला मतदार संघ म्हणून कसबा विधानसभा मतदार संघाची ओळख आहे.हा मतदार संघ तब्बल 28 वर्ष भाजपचा बालकिल्ला राहिला.पण विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर दीड वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले.त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पारंपारिक मतदार दूर गेल्याची चर्चा होती.पण त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर अशी लढत झाली.या निवडणुकीमध्ये कसबा विधानसभा मतदार संघातून मुरलीधर मोहोळ यांना चांगल मताधिक्य मिळाले.या निवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे नेते माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना पक्षाकडून दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पडली.यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश बिडकर यांची कसबा समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडी बाबत गणेश बिडकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार येणार आहे.आम्ही मागील दोन वर्षाच्या काळात अनेक समाजाभिमुख योजना आणल्या आहेत.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे.त्याच बरोबर माझ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा विधानसभा समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे.आजवर पक्षाकडून ज्या जबाबदार्‍या दिल्या आहेत.त्यांना न्याय देण्याच काम करीत आलो आहे. लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना कसबा मतदार संघातून चांगली मत मिळाली आहेत आणि पक्ष संघटन मजबूत आहे.त्यामुळे यंदा कसबा विधानसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार निवडून आणणार असल्याच त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here