कोथरूड भागात शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी लावले फ्लेक्स
मागील काही महिन्यांपासून राज्यातील महिला, मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.त्याच दरम्यान पुण्यातील कोथरूड भागातील युवक विभागाचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी राज्यातील सध्याच्या एकूणच परिस्थिती बाबत भाष्य करणारे फलक कोथरूड भागात लावले आहे.
‘या महाराष्ट्रात नक्की कोण सुरक्षित आहे ? मंत्री? नाही.आमदार? नाही.नगरसेवक? नाही.महिला? नाही.शालेय विद्यार्थिनी? नाही. मग सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी बघायचं तरी कोणाकडे ? चला संकल्प करूया ही परिस्थिती बदलण्याचा,महाराष्ट्रात परिवर्तन घडवूया,या आशा आशयाचे मजकुर असलेले फलक कोथरूड भागात ठिकठिकाणी लावले आहे.हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून याबाबत चर्चा देखील सुरू झाली आहे.