पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला सोडण्यात यावा : रिपाइं चे राज्य संघटक परशुराम वाडेकर

0
18

पुणे

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुतीमध्ये महत्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने 10 ते 12 जागांवर आपला दावा ठोकला आहे.त्यामध्ये पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हा मतदारसंघ रिपाइं साठी सोडावा अशी मागणी रिपाइं चे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी केली आहे.
याबाबत परशुराम वाडेकर म्हणाले की,आज केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची मजबूत पकड आहे. आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर काहीतरी तडजोड करणे आवश्यक आहे.या विचारातून आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेच्या विरोधी असलेल्या राजकीय पक्षांशी युती करण्याचे धैर्य रामदास आठवले साहेबांनी दाखवले.या निर्णयाचा फायदा चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांना कमी आणि भाजपला अधिक होत असल्याचे या 15 वर्षातील चित्र आहे.यामुळे आंबेडकरी समाजात नाराजीचे वातावरण असून आमच्या पक्षाला लोकसभेला संधी मिळाली नाही.त्यामुळे आता विधानसभा निवडणूकीत किमान 12 जागा मिळाव्यात ही भाजपकडे आमची मागणी आहे.तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत.यामुळे या जागेवर आम्हाला संधी मिळायला हवी. मी आजपर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे.त्यामध्ये कॅन्टोन्मेंट मतदार संघ आहे.या तीनही वेळेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत.या सर्व निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन भाजपने आम्हाला संधी द्यावी,अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,या वेळेस कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासाठी वातावरण चांगले आहे.या मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहे.भाजपने आंबेडकरी चळवळीतून आलेल्या रिपाईच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर आंबेडकरी समाजात महायुतीबद्दल एक सकारात्मक संदेश जाईल. यामुळे महायुतीला पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फायदा होईल,मागील 15 वर्षामध्ये भाजपाने महायुतीमधून एकही जागा रिपाईला दिली नाही.यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून जर या वेळेस संधी न मिळाल्यास याचा परिणाम निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.आम्हाला सन्मानपूर्वक जागा देऊन आंबेडकरी समाजाच्या नाराजी दूर करावी अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here