लाडकी बहीण योजना पॉप्युलर झाली : अजित पवार

0
23

Ladki Bahin Yojana became popular: Ajit Pawar

लाडकी बहीण योजना पॉप्युलर झाली : अजित पवार

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. महायुती सरकारने आज गेल्या सव्वा दोन वर्षातील कामांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेमार्फत मांडला.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील घडामोडी बाबत अनेक प्रश्नांवर त्यांनी उत्तर देत विरोधकांना चांगलेच सुनावले.
यावेळी अजित पवार म्हणाले की,निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमच्या समोरची लोकं सातत्याने फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. पण सर्व निवडणूक आयोगाच्या हातात असतं. त्यांना स्वायत्ता दिली आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली भाजपा-शिवसेना सरकार अस्तित्वात आलं. वर्षभराने आम्ही समाविष्ट झालो. गेले दीड वर्षे सर्वजण काम करतोय.2022/24 चे रिपोर्ट कार्ड देत असातना सातत्याने आमच्याबद्दल सांगितलं जातं की, तिजोरी मोकळी केली आहे.कर्जबाजारी झालो आहोत. मी अतिशय जबाबादारीने सांगतोय, निवडणुका जवळ येत असताना खूप कॅबिनेट होतात. तेव्हा अनेक निर्णय घेतले जातात.शेवटी शेवटी काही राहून गेलेले विषय येत असतात. त्यातून विषय मंजूर करतो. काही विचारपूर्वक योजना दिल्या. या योजनांची टिंगळटवाळी झाली, बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. लाडकी बहीण योजना पॉप्युलर झाली, महिला समाधानी आहेत. सर्व घटकांतील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. काहीही बोलण्याचा प्रयत्न होत आहे. आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण काहीतरी तारतम्य ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here