सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून नूतनीकरण व भूमिपूजन कार्यक्रम
पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथील श्री शिवाजी व्यायाम मंडळ क्रीडांगण नूतनीकरण लोकार्पण सोहळा आणि या भागातील ५० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच (शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी) संपन्न झाले.
यावेळी शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून श्री शिवाजी व्यायाम मंडळ क्रीडांगणचे ६० लक्ष रुपये खर्च करीत नुतनीकरण करण्यात आले. तर शिवाजीनगर गावठाण येथील नाथगल्ली, जोशी आळी व गणपती चौक ते सेंट्रल हॉटेल पर्यंत या ठिकाणी रुपये ५० लक्ष खर्चून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे भूमीपूजन संपन्न झाले. यावेळी भारतीय जनता पक्ष व महायुती छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी शिरोळे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थितांशी संवाद साधताना शिरोळे म्हणाले, “श्री शिवाजी व्यायाम मंडळ या वास्तूत शिवाजीनगर येथील पिढ्या घडल्या आहेत. जो येथे येऊन व्यायाम करतो त्याची तब्येत हमखास होतेच. मी नगरसेवक पदासाठी इच्छुक असताना या भागात आलो होतो. तेव्हापासून श्री शिवाजी व्यायाम मंडळ या वास्तूकडे सेवाभावनेने पाहत आलो आहे. आज याचे नूतनीकरण होत असताना कौतुक वाटते आहे. येथे आज माझ्या माध्यमातून हे काम होते आहे याचे समाधान आहे.”
शिवाजीनगर मतदार संघात मी फिरत असताना अनेक नागरिक भेटतात. या भागात मी ज्यांची ज्यांची कामे केली ते नागरिक जेव्हा कौतुक करतात तेव्हा मन भरून येते, असेही शिरोळे यांनी सांगितले. लवकरच श्री शिवाजी व्यायाम मंडळ येथे असलेल्या जीमचा कायापालट करू, असे आश्वाशन देखील शिरोळे यांनी दिले.