कोथरूड विधानसभा मतदार संघातून मला नक्कीच उमेदवारी मिळेल : अमोल बालवडकर

0
14

 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इच्छुक उमेदवार कोथरूड विधानसभा सभेतून इच्छुक असलेले अमोल बालवडकर यांची घेतली भेट

पुणे

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून या निवडणुका अगदी काही दिवसावरून आल्या आहेत.तरी देखील महायुती, महाविकास आघाडी किंवा अन्य पक्षाकडून अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर आले नाही.आम्ही लवकरच उमेदवार जाहीर करू असे प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाकडून सांगितले जात आहे.पण यामुळे विद्यमान आमदारांसमोर इच्छुक मंडळांची डोकेदुखी झाल्याचे राज्यातील अनेक भागात चित्र पाहण्यास मिळत आहे.याबाबत सांगायच झाल्यास पुणे शहरातील कोथरूड मतदार संघ हा भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळख आहे.या मतदार संघाचे भाजपचे जेष्ठ नेते मंत्री आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे आहेत.पण मागील काही महिन्यांपासून भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मतदार संघात अनेक कार्यक्रम घेऊन,आपण या मतदार संघातून भाजपकडून निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याची भूमिका वारंवार मांडत आले आहेत.अमोल बालवडकर यांच्या या ठाम भूमिकेमुळे भाजप नेत्यांची मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी वाढली आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी शहरातील अनेक नेत्यांच्या गाठीभेटीवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांची बाणेर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.त्या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.त्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलण टाळल्याने, अमोल बालवडकर यांची नाराजी दूर करण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांना अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे.
या भेटीबाबत अमोल बालवडकर म्हणाले की,मी कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक वर्षापासुन तयारी करीत आहे. आजवर मतदार संघात अनेक कार्यक्रम घेतले आहेत.माझा नागरिकांशी चांगल्या प्रकारे संवाद आहे. तसेच मागील तीन चार महिन्यांत माझ्या एकाही कार्यक्रमाला पक्षातील नेता किंवा पदाधिकारी आला नाही.याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खदखद बोलून दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,अद्यापपर्यंत पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नसून मी पक्षाच्या सर्व प्रक्रियेत बसत आहे.त्यामुळे कोथरूड विधानसभा मतदार संघातून मला नक्कीच उमेदवारी मिळेल,अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here