राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच कार्य महिलांना न्याय मिळवून देणार : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
19

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट

 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांची दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रहाटकर यांच्या कामाचा गौरव करताना म्हणाल्या की,महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून विजया रहाटकर यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली आहे.यामध्ये त्यांनी महिलांच्या लैगिक छळाबाबत आवाज उठवत मोलाचे कार्य केले.तसेच यादरम्यान त्यांनी महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. याखेरीज त्या प्रत्येक गोष्टींची माहिती ठेवत असतात. छत्रपती संभाजीनगरपासून ते राजस्थान भाजपच्या सहप्रभारी असलेल्या विजया रहाटकर यांच्यासोबत कायम संवाद होत असतो.त्या एक व्यक्ती म्हणून देखील चांगल्या असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here