शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.खासदार बजरंग सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सह अन्य उमेदवार उपस्थित होते.