कसबा विधानसभा मतदार संघातून प्रचंड मतांनी विजयी होणार : रविंद्र धंगेकर

0
16

काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर

 

पुणे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर झाली आहे.त्यामध्ये मागील काही महिन्यापासून सातत्याने चर्चेत असलेले कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.तर दुसर्‍या बाजूला महायुतीकडून अद्यापपर्यंत उमेदवार देण्यात आला नाही.
रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,कसबा पोटनिवडणुकीत या मतदार संघातील नागरिकांनी भरभरून मतदान केल्याने माझा विजयी झाला.तसेच महाविकास आघाडीतील सर्व नेते,पदाधिकारी यांनी एकदिलाने काम केले.त्यामुळे माझा विजय झाला आहे. तसेच या निवडणुकीत देखील माझा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच ते पुढे म्हणाले की,मागील दोन वर्षाच्या कालावधीत वेळोवेळी विधिमंडळ आणि शहरातील अनेक व्यासपीठावर नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्याच काम केले.पण मला महायुती मधील नेत्यांनी विकास काम करताना निधी दिली नाही.तसेच माझा निधी दुसर्‍या मतदार संघात वळविण्यात आला आहे.यामुळे विकासकाम करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या.पण मी विकास निधी काही प्रमाणात आणण्यात यशस्वी झालो असून आगामी काळात मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकासकाम केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here