“तुम्हाला पक्षाने संधी दिली नाही म्हणून काय झाले? जनता आहे ना इथे. तुम्ही निर्धास्त रहा आणि लढा.आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि राहणार आहोत.आता ही निवडणूक परिवर्तनाची आहे. आबा,तुमची महापालिकेची पहिली निवडणूक ही अपक्ष म्हणूनच होती.जनतेने मनावर घेतले तर काय होते,याचा दाखला तेंव्हा विजयाने मिळाला होता.तेव्हापासून आजपर्यंत सलग सहा वेळा तुम्ही विजयी होत आला आहात. कारण तुम्ही जनतेला भावले आहात.आता विधानसभेची निवडणूकही अपक्ष म्हणूनच आहे.त्यामुळे यंदा ‘पर्वती ‘ मध्ये परिवर्तन घडणार आणि आबा,तुम्ही आमचे हक्काचे आमदार म्हणून निवडून येणारच.” या मतदारांच्या भावना ,त्यांचा ठाम विश्वास पाहता मला निवडणूक लढायला आणखी प्रोत्साहन , बळ मिळाले आहे.
आज तळजाई टेकडी येथे क्रिकेट महर्षी सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम येथे मी ,माझ्या संपूर्ण कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने नागरिकांची भेट घेतली.त्यांच्याशी संवाद साधला.पर्वती मतदारसंघच नाहीतर संपूर्ण पुणे शहरातील नागरिक तळजाई टेकडी येथे सकाळी येतात.नागरिकांशी संवाद साधताना,’आबा, तुमचे काम बोलते, याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे आज तळजाई टेकडीचा झालेला कायापालट’ हे ऐकून मनाला समाधान वाटले.होय,आता लढायचं आहे, जनता जनार्दनासाठीच. आता जनता म्हणेल तसं!