हडपसर विधानसभा मतदार संघात यंदा परिवर्तन घडवणार : प्रशांत जगताप

0
17

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण यांची उपस्थिती

पुणे

वानवडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हडपसरमधील मंदिरामध्ये दर्शन घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी कन्यादान मंगल कार्यालयपासून पायी रॅली काढत विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रशांत जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करित परिसर दणाणून सोडला.
हडपसर विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी खासदार अमोल कोल्हे,खासदार वंदना चव्हाण,माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना नेते वसंत मोरे, अॅड जयदेव गायकवाड,बंडूतात्या गायकवाड,शहराध्यक्ष अंकुश काकडे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, प्रविण तुपे, वंदना मोडक, सुनील जगताप, विशाल तांबे, रवींद्र माळवदकर, प्रशांत सुरसे, आदी सह कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हडपसर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रशांत जगताप म्हणाले की,शरद पवार यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला असून समाजात चांगला संदेश गेला आहे.मागील पाच वर्षांत हडपसर विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाली नाही.तसेच नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे हडपसर विधानसभा मतदार संघात यंदा परिवर्तन घडवणार आणि जनता माझ्या पाठीशी उभी राहणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here