निलेश लंके यांची भाजप नेत्यांवर टीका
भाजपाने उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचण्याचं काम केलं. तसेच आमच्या शरद पवार साहेबांचे कुटुंब दोन गटात विभागण्याचं पाप केलं. त्यामुळे भाजपाला जागा दाखवण्याची हीच वेळ आहे, अशी टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार निलेश लंके यांनी केली आहे. तसेच त्यांनी कोरगावमधून संदीप वर्पे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं असं आवाहनही जनतेला केलं आहे. निलेश लंके यांनी कोपरगावमध्ये आज प्रसार माध्यमाशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य केलं.
कोपरगावची विधानसभा निवडणूक ही राज्यात रंगतदार निवडणूक होणार आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे. आज कोपरगावची परिस्थिती बघितल्यानंतर मला माझ्या निवडणुकीची आठवण झाली.मी सुद्धा २०१९ मध्ये मी धनदांडग्या विरोधात निवडणूक लढवली होती.यात जनतेने माझा बाजुने कौल दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदा कोपरगावमध्ये होणार आहे”, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली.