बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं : उपमुख्यमंत्री अजित पवार

0
17

 

बारामती लोकसभा मतदारसंघ हायवोल्टेज ठरला होता. आता विधानसभेलाही बारामती विधानसभा मतदारसंघ हायवोल्टेज ठरतोय. दोन्हीवेळी येथे कुटुंबातच टफ फाईट झाली होती. लोकसभेला राज्याने नणंद भावजयीमधील लढत पाहिली तर विधानसभेला काका-पुतण्यामधील लढत पाहायला मिळतेय. लोकसभेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का सहन करावा लागला. यावरून त्यांनी त्यांची चूकही जाहीर केली होती. आता अजित पवारांविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळे या मतदारसंघात आता कोणाची वर्णी लागेतय हे जनतेचा कौल कोणाला मिळणार यावर अवलंबून आहे. दरम्यान, यावरून अजित पवारांनी महत्त्वाचं विधानस केलंय.

“काहींनी ठरवलं होतं की लोकसभेला ताईंना निवडून द्यायचं आणि विधानसभेला दादाला. त्याबद्दल जास्त बोलणार नाही. परंतु मागच्या वेळी पहिल्या नंबरच्या मताधिक्क्याने पाठवलं. त्यामुळे मी पहिल्या नंबरचा निधी आणला. बारामतीत ९ हजार कोटी निधी देण्याचं काम केलं. यावेळीही विधानसभेत चांगल्या मताधिक्क्यांने संधी द्या”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here