आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून बैठका,मेळावे आणि रॅलीच आयोजन करून मतदारापर्यंत पोहोचण्याच प्रयत्न करीत आहे.या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघात ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’# पर्वती विधानसभा मतदार संघ या आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स लागले आहेत.
या पर्वती विधानसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली.तर महाविकास आघाडीमध्ये पर्वती विधानसभा मतदार संघ शरद पवार गट की काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ही जागा जाणार अशी चर्चा बराच काळ चालली.या मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक आबा बागूल आणि शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी कदम हे दोघेजण अनेक महिन्यांपासून विधानसभेची तयारी करीत आले आहेत.त्यामुळे या दोघांनी पक्षश्रेष्ठी आपल्याच पक्षाच्या वाट्याला ही जागा सोडली जावी अशी मागणी केल्याचे दिसून आले.या जागेवरून बराच काळ चर्चा झाल्यावर,अखेर ही जागा शरद पवार गटाला सोडण्यात आली आणि या जागेवरून माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली.
तर या मतदार संघातून 30 वर्षाहून अधिक काळ नगरसेवक म्हणून आबा बागुल हे निवडून आले आहे.
आबा बागूल यांनी 2009 पासून काँग्रेस श्रेष्ठीकडे पक्षाकडे उमेदवारी मिळावी, यासाठी मागणी करित आले.पण प्रत्येक वेळी आबा बागुल यांना डावलण्यात आले.तर यंदा हा मतदार संघ शरद पवार गटाला गेला.त्यामुळे आबा बागूल हे नाराज झाले.त्यावर त्यांनी पर्वती विधानसभा मतदार संघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यामुळे पर्वती विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, शरद पवार गटाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 तारखेपर्यंत आहे.त्यामुळे सध्या तरी तिरंगी लढत म्हणावी लागेल,काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी आबा बागूल यांची नाराजी दूर करण्यात, यशस्वी होतात का हे पहावे लागणार आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान पर्वती विधानसभा मतदार संघात ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’# पर्वती विधानसभा मतदार संघ या आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स लागले आहे.या फ्लेक्सबाजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.