हडपसरमधून प्रशांत जगताप यांना निवडून आणण्याचा शिवसैनिकांचा एकमुखी निर्धार

0
29

 

हडपसर

हडपसर विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील कन्यादान मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांना निवडून आणणार असा विश्वास शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत शहरप्रमुख संजय मोरे, माजी शहरप्रमुख नाना वाडेकर, शिवसेना नेते वसंत मोरे, जिल्हाप्रमुख विजय देशमुख, संघटक नितीन गावडे, वक्ता विद्याताई होडे, संजय सपकाळ, विभागप्रमुख दत्ताभाऊ खवळे, सतीश जगताप, प्रविण हिलगे, रामभाऊ खोमणे,जान मोहमद शेख, दिलीप व्यवहारे, अजय सपकाळ, नंदकुमार फुलारे, अमित गायकवाड, सुरज मोराळे, सागर चव्हाण, अभिजित कदम, राहुल सावंत, लखन जगताप, गणेश मोरे, गणेश देशमुख, उपविभाग प्रमुख मुकुल लाकडे, अनिकेत सपकाळ, भाऊ गायकवाड, मुन्ना माने, प्रशांत पोमण, भैया कापरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची पुन्हा सत्ता आणण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते काम करीत आहे.आपल्या शहरात देखील सर्व कार्यकर्ते जोमाने काम करीत असून हडपसर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटला.या मतदार संघातून माजी महापौर आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे आपण आघाडीचा धर्म पाळून प्रशांत जगताप यांना निवडून आणावे आणि आगामी महापालिका निवडणुकीची तयारी शिवसैनिकांनी करावी, असे आवाहन ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, वसंत मोरे, नाना वाडेकर यांनी केले.
हडपसर मतदार संघातील शिवसैनिक पेटला असून महाविकास आघाडीतील उमेदवाराचे काम करणार आणि प्रशांत जगताप यांना निवडून आणणार असा विश्वास निवडणूक समन्वयक विजय देशमुख, विभाग प्रमुख दत्ताभाऊ खवळे यांनी व्यक्त केला.
यावेळी सतीश जगताप, दत्ताभाऊ खवळे यांनी जोरदार रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here