पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या जाहीर प्रचाराला बुधवारी प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. सकाळी प्रभाग क्रमांक १७ मधील संत कबीर चौक ते पॉवर हाउस आणि सायंकाळी प्रभाग क्र २८ मधील सॅलेसबरी पार्क येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत पदयात्रा पार पडली. रमेशदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, या घोषणेने हा परिसर दणाणून गेला.
रमेश बागवे यांच्या पदयात्रेला संत कबीर चौकात बुधवारी सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आप तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले होते. आझाद मंडळ, विठोबा सोसायटी, सत्तार खान चाळ, अरुणा चौक मंडळ, पारशी आग्यारी, ताराचंद हॉस्पिटल, त्रिमूर्ती बिल्डिंग, कादरभाई चौक, लेकेऱ्या मारुती, करंडे चौक, अय्यप्पा मंदिर, दत्त मंडळ क्लब, नायडू गणपती चौक, हॉटेल पूना कॅफे, उंटाडे मारुती या मार्गे निघालेल्या पदयात्रेचा पॉवर हाउस येथे दुपारी दोन वाजता समारोप झाला. रवींद्र माळवदकर, सुनील पडवळ, राजेंद्र पडवळ, लता राजगुरू, विशाल धनवडे, प्रा. वाल्मिकी जगताप, संगीता तिवारी, रमेश अय्यर, जयंत किराड, रामभाऊ पारीख, भाई कात्रे, डॉ. वैष्णवी किराड, विजय शिंदे, शीला रतनगिरी, सुनील घाडगे, विजय वारभवन, फय्याज शेख, सुनील गवते, राजेश मोरे, शेखर जावळे, दत्ताभाऊ जाधव, उत्तम भुजबळ, उमेश शेडगे, माउली जाधव, अशोक लांडगे, अॅड. श्रीकांत अगस्ते, राजू अरोरा, सुनील दैठणकर, भोलासिंग अरोरा, मीनाताई पवार यांच्यासह विजय नायर, मधु नायर व महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या पदयात्रेचे ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. स्थानिक मंडळांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेस झिंदाबाद, राहुल गांधी झिंदाबाद, शरद पवार साहेब झिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पदयात्रेने संपूर्ण परिसर महाविकास आघाडीमय झाला होता. सायंकाळी प्रभाग क्र २८ येथील सॅलेसबरी पार्क येथे पदयात्रा पार पडली. डायस प्लॉट चौक येथून सुरुवात झालेल्या पदयात्रेचे मेनरोड ते कॅनॉल रोड, नूरानी मशीद, गवळीवाडा, खिलारे वस्ती, ढोले मळा शाळा येथे स्वागत करण्यात आले.
या पदयात्रे दरम्यान उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करतेवेळी रमेश बागवे म्हणाले की,मी पाच वर्षे येथे आमदार आणि मंत्री असताना जे काम केले ते भाजपच्या दोन आमदारांना दहा वर्षांत जमले नाही. दहा वर्षांत भाजपच्या आमदारांनी काम केले नाही तसेच निधी आणला नाही. दहा वर्षात कँटोन्मेंटच्या विकासाला पूर्ण खिळ बसली आहे. भाजप आणि महायुतीचे सरकार हे कँटोन्मेंटच्या विकासातील अडसर आहे, अशी टीका रमेश बागवे यांनी केली. कँटोन्मेंटच्या विकासासाठी दूरदृष्टी, विकासाचा ध्यास, नेतृत्व अशी क्षमता असलेला नेता आवश्यक आहे. या भागाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे. या भागाचा विकास होणार असल्याने जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.