अजितदादांनी मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडला
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मानखुर्द – शिवाजीनगर आणि सना मलिक – शेख यांच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य प्रचाररॅली निघाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली. यामध्ये प्रचाराची सुरुवात अणुशक्तीनगर आणि मानखुर्द – शिवाजीनगर या मतदारसंघात केली. अणुशक्तीनगर मतदारसंघातील या प्रचार रॅलीची सुरुवात गोवंडी टाटानगर येथून करण्यात आली तर नवाब मलिक यांच्या मानखुर्द – शिवाजीनगरमध्ये ही रॅली नेण्यात आली. या रॅलीमध्ये अजितदादा पवार, सना मलिक – शेख, नवाब मलिक यांचे नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पहार घालून उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
या भव्य रॅलीमध्ये ओपन जीपमधून अजितदादा पवार, सना मलिक – शेख, नवाब मलिक हे जनतेचे अभिवादन स्वीकारत होते. या रॅलीमध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, युवक, युवती, आबालवृद्ध आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसून येत होते.