शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना टोला
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांकडून सभा,रॅली आयोजित केली जात आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली.त्या सभेत अजित पवार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना चांगलेच सुनावल्याचे पाहण्यास मिळाले.यावेळी सुनील टिंगरे,माजी आमदार जगदीश मुळीक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आजही काही जणांची या ठिकाणी दडपशाही (बापूसाहेब पठारे) सुरू आहे. आजही दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीचे कार्यकर्ते प्रचार करित असताना त्यांना फोन केला जातो.तुझ्याकडे बघून घेईल,आम्ही काय हातामध्ये बांगड्या भरल्या आहेत काय,मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम पाहिल आहे.मी जोपर्यंत सरळ आहे.तोपर्यंत सरळ आहे.समोरच्याने जर वाकडेपणा केला.तर आरेला कारे म्हणायची ताकद आहे आणि हे जे दमदाटी करित आहेत.त्यांना आमदारकीचा दरवाजा मी दाखवला, स्थायी समितीच अध्यक्ष मी बनवल आहे. त्यामुळे या सर्वांची अंडीपिल्ली मला माहिती आहे.यामुळे तुम्ही काही काळजी करू नका,ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात,अशा शब्दात शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना टोला लगावला.
तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात कार्यकर्ते अद्याप ही काम करताना दिसत नसून कार्यकर्त्यांनी आळस झटकून कामाला लागल पाहिजे.या राज्यात पुन्हा महायुतीच सरकार आल पाहिजे,यासाठी मागील अडीच वर्षात महायुती सरकारने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या पाहिजे,अशा शब्दात त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.