एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हेमंत रासनेंच कार्यालय ठरतय सर्वसामान्यांना आधार

0
13

नागरिकांच्या समस्यांचे निवारण, तत्काळ उपाययोजना, लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविणे, विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रे, आपत्कालिन परिस्थितीत मदत यासाठी हेमंत रासने यांचे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांचा आधार ठरत असून, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह योजना यशस्वी ठरत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

सदाशिव पेठेतील कुमठेकर रोड, गायआळी चौक, गाडगीळ स्ट्रीट, भिकारदास मारुती, खजिना विहीर, नातू बाग परिसरात रासने यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या रुपालीताई ठोफ्लबरे पाटील, राघवेंद्र मानकर, अशोक येनपुरे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, दिलीप काळोखे, प्रमोद कोफ्लढरे, प्रणव गंजीवाले, अमित कंक, सुनील रसाळ, नीलेश कदम, श्रेयस लेले, बिपीन बोरावके, परेश मेहेंदळे यांचा प्रमुख सहभाग होता.

यावेळी हेमंत रासने म्हणाले की, गेली आठ दिवस मी प्रचाराच्या निमित्ताने विविध भागांतील नागरिकांना भेटत आहे. दीड वर्षे भाजपच्या माध्यमातून आम्ही करीत असलेल्या कामाबद्दल नागरिक कौतुक करीत असून, समाधानाची भावना व्यक्त करीत आहेत. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रोज प्रत्येक प्रभागात सकाळी 8 ते 10 या वेळेत नागरी समस्या समजावून घेतो. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी करतो. त्याप्रमाणे संबंधित खात्याशी संपर्क करून आवश्यक उपाययोजना केल्या जातात. मी स्वतः समस्येचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करतो. त्यामुळे आमचे जनसंपर्क कार्यालय नागरिकांना आधार वाटते.
तसेच ते पुढे म्हणाले की,संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही वीस हजार हून अधिक नागरिकांना मदत केली आहे. त्यामध्ये विविध शासकीय योजनांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12000 महिलांना लाभ मिळवून दिला. शासकीय दाखले प्रमाणपत्र आर टी ई प्रवेश, निराधारांच्या योजना याची संख्याही पाच हजाराहून अधिक आहे. एक कॉल प्रॉब्लेम सोल या योजनेअंतर्गत सात हजार हून अधिक नागरिकांची विकास कामे मार्गी लावली. त्यामध्ये ड्रेनेज लाईन, शौचालय निर्मिती, रस्ता डांबरीकरण, जलवाहिनी दुरुस्ती, कीटकनाशक फवारणी, पथदिवे दुरुस्ती, सोसायटी आणि वाड्यातील विकास कामांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here