बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात वाहतुक प्रकल्पाला मंजुरी दिली असल्याची माहिती भाजप महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज प्रेमनगर, आंबेडकर नगर परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका मानसी देशपांडे, अनुसया चव्हाण, मनोज देशपांडे, प्रीतम नागपुरे, आशा बिबवे, विजय आल्हाट, बसू गायकवाड, सुनीता मोरे, संजय गावडे, शिवम देशपांडे, ज्ञानेश्वर मानकर, शकील शेख, प्रसाद देशपांडे, उषा साळवे, तुकाराम खंडागळे, ब्रम्हा मिसाळ, चेतन क्षीरसागर, आप्पा गाढवे, नवनाथ वांजळे, गायत्री कांबळे यांचा प्रमुख सहभाग होता.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोफ्लडी होते. ही कोफ्लडी सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि कात्रजहून बिबवेवाडीकडे जाण्यासाठी स्वतंत्र 24 मीटर रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. बिबवेवाडी ते कोफ्लढवा रस्त्यावर 520 मीटर लांबीचा आणि 16 मीटर रुंदीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. आई माता मंदिर ते मार्केट यार्ड या दरम्यान 460 मीटर लांबीचा आणि साडेतेरा मीटर रुंदीचा ग्रेड सेपरेटर आणि आई माता मंदिर ते झाला कॉम्प्लेक्स दरम्यान 24 मीटरचा स्वतंत्र रस्ता होणार आहे. या प्रकल्पाला 93 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एटीएमस ही अत्याधुनिक, स्वयंचलित वाहतूक सिग्नल प्रणाली पर्वती मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांवर कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहतुकीची गती वाढवून नागरिकांचा वेळ वाचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. चौकातील वाहनांची संख्या आणि वर्दळीनुसार सिग्नलचे व्यवस्थापन, प्रभावी वापरामुळे श्रम, वेळ, इंधनाची बचत होऊन प्रदूषणात घट होणार आहे. या माहितीचे संगणकीय यंत्रणेद्वारे संकलन, देवाण-घेवाण होऊन पुढील सिग्नल सिंक्रोनाइज होणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक गतीने पुढे जाण्यास मदत होणार आहे.