(संग्रहित फोटो)
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे गेवराई मतदार संघातील अधिकृत उमेदवार पूजा अशोक मोरे यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचे जाहीर सभा पार पडली यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी भाषणामध्ये पंडित व माजी आमदार पवार यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले.
निवडणुकीमध्ये लोकशाही पद्धतीने मुद्दे मांडा परंतु जर स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांच्या व कार्यकर्त्यांच्या अंगावर आलात तर गाठ छत्रपती संभाजीराजे यांच्याशी आहे असे म्हणाले, निवडणूक मुद्द्यांनी लढली पाहिजे, परंतु जर कोणी दंडलशाही करेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे संभाजीराजे म्हणाले.