पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय डाकले यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा अधिकृत पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी दिली.
याबाबत धनंजय जाधव म्हणाले की, “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा लोकहिताच्या मुद्द्यांसाठी वचनबद्ध आहे.आम्ही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मनीष आनंद आणि कोथरूड विधानसभा मतदार संघात विजय डाकले हे दोन्ही उमेदवार स्थानिक समस्यांना जाणून घेत सकारात्मक दृष्टिकोनाने काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होईल, असा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.या उमेदवारांमुळे त्या-त्या मतदारसंघात निश्चित सकारात्मक बदल होईल,असा आमचा विश्वास आहे.तसेच विजय डाकले हे कोथरुड मतदारसंघात एसआरए प्रकल्प, महापालिका कामगारांचे प्रश्न आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत.त्यामुळे स्वराज्य पक्षाच्या या निर्णयामुळे अपक्ष उमेदवारांना अधिक बळ मिळाले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.