विस्थापितांना ताकद आणि अन्यायग्रस्तांना न्याय देणं हेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उद्दिष्ट : संभाजीराजे छत्रपती

0
9

एकाच घरात तीस-तीस, चाळीस-चाळीस वर्षे सत्ताकेंद्र आहेत. या राजकीय घरणेशाहीविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष उभा आहे. त्यामुळे विस्थापितांना न्याय देणं आणि ज्या सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हीच स्वराज्य पक्षाची भूमिका आहे.विस्थापितांना ताकद आणि अन्यायग्रस्तांना न्याय देणं हेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उद्दिष्ट आहे.असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यातील जाहीर सभेत केले.

परिवर्तन महाशक्तीतील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील कॅंटॉन्मेंट मतदारसंघाचे उमेदवार यशवंत नडगम, कसबा उमेदवार ओंकार येनपुरे, पुरंदर विधानसभेचे उमेदवार सुरज घोरपडे, शिरूर विधानसभेचे उमेदवार विनोद चांदगुडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत संभाजीराजे छत्रपती बोलत होते. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघातील कॉँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनीष आनंद, कोथरूड विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय डाकले यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, धर्माच्या नावावर राजकारण केलं जात असून विकासाच्या मुददयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचेही संभाजीराजे छत्रपती आपल्या भाषणात म्हणाले. पैसे देऊन लोकांची मते विकत घेणं ही लोकशाहीची थट्टा आहे. रोजगार निर्मिती, शिक्षणाचा उत्तम दर्जा, पायाभूत सुविधांचा विकास, उत्तम आरोग्य सुविधा यावर कुणीच बोलायला तयार नाही.या सगळ्या घाणेरड्या राजकारणात विकासाच्या मुद्द्यावर भर देत एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोकांनी साथ द्यावी असेही आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी याठिकाणी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here