खासदार अमोल कोल्हे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला
पुणे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यभरातील इच्छुक उमेदवारांची मुलाखती पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे घेत येत आहे.तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर जे नेते मंडळी महायुती सोबत होते.त्यापैकी अनेक नेते महाविकास आघाडी सोबत येण्यास तयार असल्याच मागील काही दिवसामध्ये दिसून आले आहे.तर त्यामध्ये शरद पवार यांच्या गटामध्ये अनेक नेते येण्यास अधिक इच्छुक आहे.त्याबाबत सांगायचे झाल्यास राज्यभरातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत शरद पवार हे घेत असून इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहे.यामुळे शरद पवार यांच्या सोबत सुरुवातीपासून असलेल्या पदाधिकाऱ्यामध्ये धाकधूक आहे की, आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही.
याबाबत खासदार अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली.त्यावेळी अजितदादा सोबत 40 आमदार गेल्यानंतर आता पक्षात पुढे काय होणार,अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली.पण आजच्या घडीला एक बाब अभिमानाने सांगावे वाटते.ती म्हणजे 40 गेले पण आगामी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी राज्यभरामधून तब्बल 1600 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत.यातून शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा किती ठाम विश्वास असल्याचे दिसून येत असल्याची भूमिका मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.