संविधान दिना निमित्त पुण्यात पार पडणार ‘भारतीय संविधान विचार संमेलन’

0
5

 

विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने आयोजन

सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व संविधान भेट देणार; परशुराम वाडेकर यांची माहिती

भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे च्या वतीने ‘संविधान दिना निमित्त  भारतीय संविधान विचार संमेलन येत्या २६ नोव्हेंबर आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचा विषय ‘भारतीय संविधानाचे ७५ वर्षे विकास व वाटचाल’ असून यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते सहभागी होणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिव परशुराम वाडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, सुनिल महाजन, विठ्ठल गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

भारतीय संविधान विचार संमेलना बद्दल अधिक माहिती देताना परशुराम वाडेकर म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे २६  नोव्हेंबर २०२४  रोजी दिवसभर विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत  सुप्रसिद्ध गायक विजय कावळे आणि पार्टी ‘संविधानाचा जलसा’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील, यानंतर सकाळी ११  वा. मुख्य उद्घाटन समारंभ होणार आहे, संमेलनाचे उद्घाटन  मा. न्यायमुर्ती (निवृत्त) अभय ठिपसे यांच्या हस्ते होणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी डी.आय.जी. सुधाकर सुराडकर असणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून  डॉ. सुरेंद्र जोंधळे (मुंबई) , इरफान इंजिनिअर ( मुंबई) , समाजवादी जन परिषदेच्या अखिल भारतीय अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर, ह.भ.प . श्यामसुंदर महाराज सोनार उपस्थित राहणार आहेत.

दुपारी  २.३० ते ३.३० दरम्यान प्रकाश घोडके यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे, यामध्ये अंजली कुलकर्णी, वीरा राठोड, देवा झिंजाड, स्वप्निल चौधरी, सागर काकडे, जित्या जाली यांचा समावेश आहे, तर  सुत्रसंचालन सुमित गुणवंत करणार आहेत.

संमेलनाच्या समारोपाचे सत्र दुपारी  ३.३० ते ६ वा. दरम्यान संपन्न होणार आहे, या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी  प्रा.डॉ. रोणकी राम (चंदीगड)  असणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून  ज्येष्ठ घटनातज्ज्ञ  प्रा. उल्हास बापट,  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,  अॅड. दिशा वाडेकर (दिल्ली) , ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे सहभागी होणार आहेत.

पन्नासहून अधिक कलावंताचा समावेश असलेल्या ‘भारतीय संविधान का संगीतमय सकर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने भारतीय संविधान विचार संमेलनाचा समारोप होणार आहे, या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनिल महाजन यांची असून नृत्य दिग्दर्शन  निकिता मोघे, संहिता लेखन  सक्ष्‌मीकांत देशमुख यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संयोजन  दिपक म्हस्के, केतकी महाजन-बोरकर यांचे आहे तर संदीप उबाळे, सौरभ दफ्तरदार, रश्मी मोघे हे गायक आहेत, दृकश्राव्य  महेश लिमये तर अमृता ठाकुरदेसाई, नितीन पवार, तन्मय पवार, नितीन शिंदे, अपुर्व द्रविड, प्रकाश गुप्ते या वादकांचा यात सामवेश असून या कार्यक्रमाचे निवेदन महेंश गायकवाड करणार असल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

दरम्यान, या संमेलनात पुण्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व संविधान भेट दिले जाईल असे वाडेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here