जगभरातील अनेक देशात आयर्न मॅन स्पर्धा आयोजित केली जाते.ही स्पर्धा खूप कठीण असते.यामुळे सहभागी होणार्या स्पर्धकांची संख्या देखील कमी असते.तर 1 डिसेंबर 2024 रोजी आयर्न मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातील 1700 स्पर्धक सहभागी झाले होते.त्यापैकी 1100 जणांना ही स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यात यश आले.तर या 1100 जणांमध्ये पुण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे हे देखील होते.तसेच 3.8 किमी स्विमिंग,180 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी धावणे हे सलग 17 तासामध्ये पूर्ण करण्याचा आयोजकांचा नियम आहे.मात्र विष्णु ताम्हाणे यांनी 15 तास 40 मिनिट आणि 40 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. वयाच्या 56 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकल्याने विष्णु ताम्हाणे यांच सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
आयर्न मॅन स्पर्धेतील अनुभवाबाबत विष्णु ताम्हाणे म्हणाले की,आई आणि वडील हे या स्पर्धेसाठी प्रेरणा स्थान आहेत.वडिलांना वयाच्या 75 वर्षी पॅरॅलिसिस झाला होता आणि त्यांच्या पायाचे हाड देखील मोडले होते.माझे घरी चौथ्या मजल्यावर होते आणि त्या ठिकाणी लिफ्ट नव्हती.यामुळे वडीलांना उपचारासाठी घेऊन जाताना खूप त्रास होत होता.हे पाहून वडिलांना पाठीवर घेऊन चौथ्या मजल्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी मला पाठीला चमक मारली आणि मला खूप त्रास झाला.त्यानंतर वडीलांच्या सेवेसाठी स्वतः दररोज रनिंग करित राहिले.त्या माध्यमांतून माझ्यामध्ये रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग याची अधिक आवड निर्माण होती गेली.त्यानंतर कुठे ही मॅराथॉन स्पर्धा असली की,सहभागी होत गेलो आणि त्यामध्ये यश मिळत राहिले.रोजच्या या चांगल्या सवयीमुळे माझ्यात खूप बदल होत गेला. हे लक्षात घेऊन समर्थ आणि मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना,सायकल वर पेट्रोलिंग करण्याचा निर्णय घेतला.या उपक्रमाला कर्मचारी वर्गाने चांगली साथ दिली.यामुळे अनेकांच्या आरोग्याच्या तक्रारी देखील दूर झाल्याचे सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,प्रत्येक जण आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी कष्ट घेत असतो. त्यानुसार माझ स्वप्न होत की,आयर्न मॅन स्पर्धा जिंकायची आणि त्या दृष्टीने सराव देखील सुरू ठेवला. मागील वर्षी आर्यन मॅन स्पर्धेत सहभागी झालो.पण अपयश आले.यामुळे मनात दुःख होत.त्यावेळी ठरवले की,पुढील वर्षी होणार्या सहभागी होऊन स्पर्धा जिंकायची त्या दृष्टीने सराव सुरू केला.अनेकांचे मार्गदर्शन घेतले आणि 1 डिसेंबर 2024 रोजी होणार्या आयर्न मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.तर या स्पर्धेत 3.8 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी धावणे हे सलग 17 तासामध्ये पूर्ण करणे आवश्यक असते,असा नियम आहे.या स्पर्धेत जगभरातील 1700 जण सहभागी झाले होते.मी आणि माझ्या सोबत तिघेजण स्पर्धेच्या चार दिवस अगोदर पोहोचलो.त्या ठिकाणी सराव केला.आपल्या येथील आणि तेथील परिस्थिती वेगळीच असल्याचे सरावा दरम्यान जाणवल.पण काही झाले तरी यंदा ही स्पर्धा जिंकायची असे मनाशी ठरवले, स्पर्धेच्या दिवशी स्विमिंग करतेवेळी 3.8 किलोमीटर चा प्रवास पार करतेवेळी लाट मोठ्या प्रमाणावर उसळत होत्या.यामुळे प्रचंड थकवा.यामुळे अधिक वेळ गेला.मात्र सायकलिंग आणि रनिंगमध्ये वाया गेलेला वेळ कव्हर केले.अखेर 15 तास 40 मिनिट आणि 40 सेकंदात आयर्न मॅन जिंकण्यात यश आले.यामुळे खूप आनंदी आणि समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.