भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात पुण्यात ठाकरे गटाकडून रास्ता रोको आंदोलन

0
1

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उद्देशून केलेल्या अवमानकारक वक्तव्या विरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करून निषेध करण्यात आला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर का अवमान नही सहेगा हिंदुस्तान”, बोला जय भिम”, ” मी आंबेडकर.. तू आंबेडकर … अशा घोषणेने पुण्यात दांडेकर पूल परिसरात शिवसेना [उद्धव बाळासाहेब ठाकरे] पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी शिवसैनिकांसोबत स्थानिक नागरिकांनीही, महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला , आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले, आणि अमित शाह ह्यांनी गृहमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला बुध्दीचातुर्याने राज्यघटना दिल्यामुळेच आपण देशाचे गृहमंत्री म्हणून संसदेत आहेत. आणि तिथे बसूनच आपण पूजनीय असलेल्या विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करता, भाजपच्या पोटातले आपण ओठावर आणले. देवाची पूजा आम्ही सर्व बांधव आवर्जून करतो. त्यासोबतच ज्यांनी आम्हाला स्वर्गाहून चांगल स्वराज्य दिल. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करतो. देशाला ज्यांनी राज्यघटना दिली. संविधान लिहून कायदा तयार केला. सर्वाना समान जगण्याचा हक्क, अधिकार दिला. तडीपार गुन्हेगार असूनही त्यांना निवडणूक लढवण्याचा हक्क दिला. सभागृहात मानसन्मान मिळवून दिला. ज्या महामानवाने न्याय मिळण्यासाठी न्यायालय दिले. पृथ्वीवरच स्वर्गसुख दिले. त्या परमपूज्य, विश्वरत्न, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचीदेखील आम्ही पूजा करतो. तुमच्या देवाची आठवण सांगतो. पुण्यात औंध भागात ज्यावेळी आधुनिक देवाच मंदिर उभ करून आधुनिक देवाची पूजा सुरू झाली. त्यावेळी आपण गप्प होतात. तेव्हा 7 जन्माच्या स्वर्गसुखाची आठवण नाही झाली. महागाईच्या देवाची शिवसेनेने पूजा केली आणि आधुनिक देव मंदिरासहित गायब झाला.हे आपण हेतुपुरस्सर विसरलात.ज्यांनी जगण्याच सामर्थ्य दिलं त्यांचीच अवहेलना करता,अशा शब्दात त्यांनी निषेध नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here