बारामती मतदारसंघातील रुई या गावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केले.यावेळी अजित पवार यांना भेटण्यासाठी सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते.तर या ठिकाणी काही तरुण मुले एक बॅनर घेऊन उभे दिसले आणि त्या बॅनरकडे गावातील सर्व मतदारांचे लक्ष वेधून घेतले.आमचे भविष्य ज्योतिषाकडे जाऊन बघू नका, तर अजित दादांना मत देऊन बघा..! दादांचे भविष्यातील मतदार आम्ही रुईकर,अशा आशयाचे बॅनर हातामध्ये घेऊन दोन तरुण उभा होते.या तरुण मुलांच्या बॅनरची चर्चा गावभर झाली.