कोण कोणाला पाडा असे म्हणू शकत नाही, अशी परिस्थिती पुन्हा राज्यात येणार नाही : भाजप नेत्या पंकजा मुंडे

0
15

आम्ही कार्यकर्ते एक विचारधारा आधारे निवडणूक लढत आहे.आघाडी सरकार जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आले आणि जनतेकरीता त्यांनी काही केले नाही.लोकसभा निवडणुकीत मराठवाडामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली नाही.पण जनता सुज्ञ असून कोणत्याही फेक नरेटिव्हला ते बळी पडणार नाही.विकासाचे बाजूने जनता मते देईल. कोण कोणाला पाडा असे आता म्हणू शकत नाही, अशी परिस्थिती पुन्हा राज्यात येणार नाही. मनोज जरांगे यांच्या निर्णय बद्दल मी काही बोलणार नाही, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढण्याचा किंवा न लढविण्याचा अधिकार आहे. त्यांच्या फायदा आणि नुकसानवर आधारित आम्ही निवडणूक लढत नाही, लोकशाहीत विरोधक त्यांची भूमिका मांडतात आम्ही आमचे पक्ष काम करत आहे असे मत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कवीटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर , नामदेव माळवदे उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, दिवाळी पार पडली असून भाऊबीज आता झाल्याने सर्वजण निवडणूक तयारीस लागले आहे. पुणे जिल्ह्यात 21 जागा असून 18 आमच्या महायुतीकडे आहे. आता आम्ही सर्व 21 जागा जिंकवणे प्रयत्न करत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना घेऊन आम्ही मतदार यांच्यापर्यंत पोहचत आहे. सरकारचे उत्कृष्ट निर्णय सोबत घेऊन आम्ही वाटचाल करत आहे पण लोकसभा निवडणुकीत आम्हाला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. जे फेक नारेटिवह तयार करण्यात आले त्यावर आता जनतेचे डोळे खाडकन उघडले आहे. हरियाणा मध्ये भाजपला जनतेने साथ दिली असून तेच चित्र राज्यात दिसेल.सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून आम्ही मागील निवडणुकीत विजय मिळवला पण अनपेक्षित आघाडी राज्यात झाल्याने आम्ही काही काळ सत्तेबाहेर राहिलो. मात्र, आता आम्ही पूर्ण तयारीने निवडणुकीत तयारी करत आहे. भाजप मध्ये पक्षाचा आदेश अंतिम असतो, कार्यकर्ते एखादा निर्णय होईपर्यंत वाट पाहतात, मागणी करतात पण त्यानंतर ते पक्ष आदेश पाळतात. जातीचे किंवा धर्माचे ध्रुवीकरण करून मते मिळवणे सवय नव्या पिढीला लागू नये. सरकारने मागील अडीच वर्षात मोठे काम केले आहे त्यामुळे त्यापूर्वी आघाडी सरकारने जे काम राज्यात केले त्यामुळे ते पुन्हा सत्तेत नको असे मतदारांना वाटत आहे. भाजपचे सर्व नेते निवडणूक तयारीस लागलेले आहे. आता निवडणुकीत वेगळे चित्र सर्वांना पाहवयास मिळेल. चांगल्या लोकांना निवडून देऊन चांगले सरकार बहुमताने जनतेला देऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे.
महायुती मध्ये कोणतीही उमेदवार बाबत मतभेद नाही. ज्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. राज्यभरात माझा निवडणूक दौरा असून विविध ठिकाणी पक्ष सांगेल तिथे मी प्रचारास जाणार आहे. माझी लाडकी बहिण योजना चांगली असून ती चांगल्या प्रकारे राज्यात राबवली गेली आहे. कोल्हापूर मध्ये मधुरीमा राजे यांनी आघाडीची अधिकृत उमेदवारी मागे घेतली याबाबत त्या म्हणाल्या, असा निर्णय जात होत असेल तर एखाद्या व्यक्तीसाठी आणि पक्षासाठी ती खच्चीकरण करणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here