‘परिवर्तन महाशक्ती’ चे 150 जागांचे वाटप पुर्ण

0
16

 

पुणे

राज्यामध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यानंतर ‘परिवर्तन महाशक्ती’ च्या वतीने पुण्यातील स्वराज्य भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे व अनेक समविचारी नेते एकत्रित आले होते.
या बैठकीदरम्यान 150 जागांवरील वाटप पुर्ण झाली असून उर्वरित जागाबाबत देखील लवकर निर्णय घेतला जाईल,असे यावेळी सांगण्यात आले.
‘महाविकास आघाडी आणि महायुती हे वेगवेगळ्या रंगाचे दोन पॅकेज आहेत परंतु आतमध्ये एकच माल आहे.’ अशी टिका राजू शेट्टी यांनी आघाडी व युती वर केली.’आमचे सरकार एका झेंड्याचे नसेल तर आमच्या डोक्यात तिरंगा असेल.’ असे प्रतिपादन बच्चू कडू यांनी केले.

‘राजू शेट्टी व बच्चू कडू यांच्याविषयी गैरसमज पसरवणारे अनेक मॅसेज सध्या फिरत आहेत, त्यांना उत्तर म्हणजे आजची बैठक आहे’ असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी बच्चू कडू व राजू शेट्टी परिवर्तन महाशक्ती सोबतच राहणार असल्याचे सांगितले.
या बैठकीसाठी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, रघुनाथ चित्रे, प्रहार पक्षाचे अनिल चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here