बहुजन समाजातील एक कार्यकर्ता भाजपच्या बालकिल्ल्यास सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही : विजय डाकले

0
35

कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विजय डाकले

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदार संघ चर्चेत असून या मतदार संघातून भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.तर दुसर्‍या बाजूला ठाकरे गटाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि मनसेने माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.पण या तीनही पक्षातील उमेदवारांमध्ये अजित पवार यांचे कट्टर समर्थक विजय डाकले यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कोथरूड मधील निवडणुकीत खर्‍या अर्थाने रंगत वाढली आहे.
तर या पार्श्वभूमीवर विजय डाकले यांच्याशी संवाद साधला असता,ते म्हणाले की,मागील 30 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करीत आहे.या कालावधीत कोथरूड भागातील प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला धावून गेलो आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक मी लढवली पाहिजे,अशी भावना तमाम कार्यकर्त्यांची होती.त्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदार संघ हा आपल्या पक्षाच्या वाट्याला यावा आणि त्या जागेवरून मी इच्छुक असल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवली.परंतु त्यामध्ये काही यश आले नाही.त्यामुळे मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्त्याची भावना लक्षात घेऊन अपक्ष निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आणि अर्ज देखील दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,कोथरूड विधानसभा मतदार संघ हा आजवर भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळख राहिला आहे.पण आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन समजातील एक कार्यकर्ता भाजपच्या बालकिल्ल्यास सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही आणि विधिमंडळात बहुजन समजातील एक कार्यकर्ता विधिमंडळात जाईल,सर्व सामन्य नागरिकांचे प्रश्न मांडणार अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here