मागील कित्येक वर्षांपासून दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने आजवर हजारो नागरिकांना भाजपचे नेते माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी दिवाळी फराळाचे साहित्य वाटप केले आहे.तर सद्य स्थितीला भोर मुळशी वेल्हा परिसरातील तब्बल 66 हजार कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
भोर विधानसभा मतदार संघ हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मानला जातो.तरी देखील या मतदार संघात किरण दगडे पाटील अगदी सूक्ष्म नियोजन करून भोर शहर आणि परिसरात 20 हजार कुटुंबांना, तर राजगड (वेल्हे) तालुक्यात 10 कुटुंबांना,भोर तालुक्यातील हायवे लगतच्या गावांमध्ये 10 हजार कुटुंबांना,घोटावडे फाटा येथील 20 कुटुंबांना, हिंजवडी मान येथील 6 हजार कुटुंबांना अशी एकूण 66 हजार कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.तर किरण दगडे पाटील यांच्या ठिकठिकाणी होणार्या कार्यक्रमाना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
त्याबाबत किरण दगडे पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,मी राजकीय जीवनात येण्यापूर्वी पासून दिवाळी फराळ साहित्य वाटपाचा उपक्रम घेत आलो आहे.प्रत्येक वर्षी नागरिकांना भेटून साहित्य दिल्यावर त्यांच्याशी संवाद साधल्यावर काम करण्याची एक वेगळीच ऊर्जा मिळते.तसेच त्यांच्या अडीअडचणी समजण्यास मदत होते.तर आज अखेर भोर मुळशी वेल्हा परिसरातील 66 हजार कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्य वाटप केले असून या भागातील शेवटच्या घटकांपर्यंत हे साहित्य वाटप झाले पाहिजे. जेणेकरून दिवाळी सण साजरा झाला पाहिजे,हेच माझे उद्दिष्ट असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.