केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित
पुणे
शिवाजीनगरचे ग्रामदैवत श्री रोकडोबाचे महायुतीचे उमेदवार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दर्शन घेतले.त्यानंतर तेथून घोले रोडवरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनपर्यंत पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.या पदयात्रेत केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,दत्ता खाडे,अजय दुधाने, बाळासाहेब बोडके,अभिषेक बोके,संजय डोंगरे,रमेश ठोसर, युवराज शिंगाडे, तम्मा विटकर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुती कटिबद्ध असून, मतदारांच्या विश्वासास पात्र ठरेल आणि महायुतीचे पुण्यातील सर्वच उमेदवार विजयी होतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच ते पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघासाठी आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे सतत पाच वर्षे कार्यरत राहिले.वाड्या वस्त्यांवरही त्यांनी संपर्क ठेवला अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी सिद्धार्थ शिरोळे यांचे कौतुक करित शुभेछा दिल्या.
या पदयात्रे दरम्यान आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की,मी नगरसेवक आणि आमदार म्हणून या मतदार संघात काम करित आलो आहे.या कालावधीत पक्षातील वरीष्ठ नेत्यांचे कायम मार्गदर्शन करित राहिले.यामुळे सातत्याने मतदार संघात नवनवीन प्रकल्प,योजना राबवू शकलो.त्यामुळे माझ्या कामाची दखल घेऊन मला पुन्हा उमेदवारी दिली.यामुळे मी महायुती मधील सर्व नेत्यांचा आभारी असून यापुढील काळात मोठय़ा प्रमाणावर विकास काम केली जाणार आहेत.या निवडणुकीत देखील शिवाजीनगर मतदार संघातील नागरिक माझ्या पाठीशी राहतील आणि प्रचंड मतांनी निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.