राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी महायुतीमधील भाजपाला 132,शिंदे गटाला 57 जागा आणि अजित पवार गटाला 41 जागा निवडून आल्या आहेत.तर या निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत.तर या निवडणुकीत पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा माधुरी मिसाळ या निवडून आल्या आहेत.तर प्रत्येक निवडणुकीनंतर माधुरी मिसाळ यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा ऐकण्यास मिळाली आणि त्या त्या वेळी त्यांच्या मंत्री पदाला हुलकावणी मिळाल्याचे पाहण्यास मिळाले.पण यंदाच्या निवडणुकीत माधुरी मिसाळ या चौथ्यांदा विजयी होऊन 54 हजाराहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.यामुळे यंदा तरी मंत्रीपद मिळणार का अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या माधुरी मिसाळ यांना 1,18,193 तर शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांना 63,533 आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांना 10,476 या मतांच्या आकडेवारीवरून 54 हजाराहून अधिक मतांनी माधुरी मिसाळ या विजयी झाल्या आहेत.
यावेळी माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पर्वती विधानसभा मतदार संघात मागील 15 वर्षांत विविध विकासकाम केली आहे.त्या कामांच्या जोरावर मी निवडून आले आहे.येत्या पाच वर्षात अनेक प्रकल्प मतदार संघात आणले जाणार आहे.तसेच मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून मला तुमची सेवा करण्याची संधी दिली. त्या बद्दल मी तुमची आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.