छगन भुजबळांनी आमच्यासारख्या पुतण्यांना बरोबर घेऊन एक पक्ष काढावा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

0
14

काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. छगन भुजबळ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना समीर भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे, असे ते म्हणाले होते. याशिवाय त्यांनी काही नेत्यांची उदारहरणंदेखील दिली होती. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाष्य केलं आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की,छगन भुजबळांनी आता आमच्यासारख्या पुतण्यांना बरोबर घेऊन एक पक्ष काढावा,खरं तर छगन भुजबळसुद्धा पुतण्याबरोबरच पक्षातून बाहेर पडले. ते काकांबरोबर थांबले नाहीत.त्यांनी तरी किमान काकांची साथ सोडायला नको होती,अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना टोला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here