कुलाबा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुतळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मीना कांबळी, विभागप्रमुख दिलीप नाईक आदी उपस्थित होत्या.तसेच मोठया संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती.