आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना विक्रमी मताधिक्यासाठी सर्वसमावेशक रणनीती : प्रचारप्रमुख दत्ता खाडे

0
15

 

विकासकामांची माहिती घराघरांत पोहोचविणार

पुणे

मागील पाच वर्षांत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विकासकामांच्या माध्यमातून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा विश्वास संपादन केला असून, यंदाही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. शिरोळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रचाराची सर्वसमावेशक रणनीती आखण्या आली असून, पुढचे पंधरा दिवस मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचे भाजपाचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख दत्ता खाडे यांनी सांगितले.
शिरोळे घराण्याचा लोकसेवेचा वारसा, सामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि तरुण, आश्वासक चेहरा ही वैशिष्ट्ये असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षांत परिसरातील नागरिकांशी नाळ जोडली आहे. शिवाजीनगर मतदारसंघात मेट्रोपासून झोपडपट्टी भागातील पायाभूत सुविधांपर्यंत, तसेच मतदारसंघाला डिजिटल बनविण्यापासून केंद्राच्या शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यापर्यंत अनेक प्रकारच्या विकासकामांना गती दिली आहे. त्याद्वारे त्यांनी कार्यक्षम आमदार ही प्रतिमा जनमानसांत ठसविली आहे. त्यामुळे आजघडीला मतदार त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत, असे चित्र निवडणूकपूर्व आढाव्यातून स्पष्ट झाल्याचेही खाडे यांनी सांगितले.
गोखलेनगर हा गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय वस्तीचा भाग, सेनापती बापट रोडवरील उच्चभ्रू लोकवस्ती, शिवाजीनगर गावठाण व परिसरातील पारंपरिक कुटुंब या सगळ्यांच्या गरजा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांनी या सगळ्या लोकांशी दांडगा संपर्क राखून, लोकसहभागाला प्राधान्य देत त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आणि समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यातून आश्वासक आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. केवळ भाजपच नव्हे, तर सर्व पक्षांचे नेते-कार्यकर्ते आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सिद्धार्थ यांच्याकडे बघतात, हे त्यांच्या कार्यशैलीचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here