काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश

0
16

Current Congress MLA Hiraman Khoskar joins Nationalist Congress (Ajit Pawar) party

इगतपुरीचे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत आमदार हिरामण खोसकर यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
इगतपुरीचे आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते श्री. हिरामण खोसकर यांनी आज राष्ट्रवादीचे विकासाभिमुख विचार स्वीकारत माझ्या आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here