वडगावशेरी भागात येत्या काळात विकास कामावर भर देणार : आमदार बापूसाहेब पठारे

0
5

 

पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदार संघ मागील सहा महिन्यापासून चर्चेत राहिला.या मतदार संघातील कल्याणीनगर भागात आलिशान पोर्श या कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली होती. तर या कारचा चालक अल्पवयीन होता आणि तो एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता.त्या आरोपीला अजित पवार गटाचे स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता.यावरून सुनील टिंगरे यांच्यावर चहूबाजूने टीका होत होती आणि विधानसभा निवडणुकीतील प्रचारा दरम्यान हाच मुद्दा चर्चेला गेला.यामुळे सुनील टिंगरे यांना 1,28,979 तर शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना 1,33,689 मत मिळाली.या मतांच्या आकडेवारीवरून 2 हजार 19 मतांनी सुनील टिंगरे यांचा पराभव झाला.
या निकालानंतर बापूसाहेब पठारे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,वडगावशेरी विधानसभा मतदार संघात प्रचारा दरम्यान खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने,त्यांच्या विरोधात (सुनील टिंगरे)निकाल लागला आहे.तसेच या निवडणुकीमध्ये पोर्श प्रकरणाचा फरक पडलेला नाही आणि आता निवडणुक झाली आहे.आता सर्व संपल असून वडगावशेरी भागात येत्या काळात विकास कामावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here