स्व धनंजय भिडे सरांचे फुटबॉल प्रती समर्पित योगदान क्रीडा क्षेत्रासाठी आदर्श…!!
शहरांच्या स्मार्ट विकासात ‘मातीची मैदाने हरवत चालल्याची खंत असून, क्रीडा संस्कृती’ची गळचेपी होणे पुणे शहरा करीता भुषणावह नसल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
न्यू इंग्लीश स्कूल रमणबाग माजी विद्यार्थी व टायगर्स कंबाइन फुटबॉल क्लब आयोजित स्व धनंजय भिडे सरां’चे स्मृती प्रित्यर्थ, 7 A साईड ‘जिल्हा स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.’फुटबॉल प्रशिक्षक स्व धनंजय भिडे सरांचे क्रीडा क्षेत्रातील निःस्पृह समर्पित योगदान आदर्श ठरणारे आहे’ असून भिडे सरांचा ‘माजी विद्यार्थी शिष्य-वर्ग’ या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचे पश्चात क्रीडा संस्कार व संस्कृती जोपासत आहेत हे कोतुकास्पद असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
स्व : भिडे स्मृती स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून, दि २६ एप्रिल रोजी सदर स्पर्धेचे ऊदघाटन आमदार हेमंत रासने यांचे हस्ते झाले तर समारोप व बक्षीस वितरण गोपाळदादा तिवारी, ऊद्योजक जयंत रणधीर, सौ चारुलता प्रभूदेसाई, मेघराज निंबाळकर इ मान्यवरांच्या हस्ते झाले.
दोन दिवसीय स्पर्धेसाठी एकूण १४ संघ स्पर्धेत उतरले होते. पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन च्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न झाल्या.
त्याचा बक्षीस समारंभ काल रविवार दि २७ एप्रिल रोजी स्पर्धा संपताच करण्यात आला असून, स्पर्धेचा निकाल सोबत दिला आहे.
स्पर्धेचे आयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे नितीन भूतकर, हर्षद सप्तर्षी, महेश पोंक्षे, गणेश शिंदे, अभिजीत मेहेंदळे व सहकारी यांनी केले. सुत्र संचालन रोहीत रणधीर यांनी, तर आभार प्रदर्शन शेलार सर यांनी केले.
या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या मुख्याध्यापिका चारुलता प्रभूदेसाई, उद्योजक जयंत रणधीर, छ राजाराम मंडळाचे मेघराज निंबाळकर, कोल्हटकर, शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत रणधीर यांनी भविष्यात स्व भिडे सरांचे स्मृतीपर राज्य स्तरीय स्पर्धा भरवण्या विषयी सुचना केली तर मुख्याध्यापिका सौ चारुलता प्रभूदेसाई यांनी ‘शाळा
मैदानास देखील महत्त्व देत त्याचे जतन करण्याचा प्रयत्न करत असुन, धनंजय भिडे सरांच्या प्राध्यापकीय कारकिर्दित, शिक्षणा बरोबर त्यांचे खेळासाठीचे योगदान व त्यांनी घडवलेल्या खेळाडू शिष्य विद्यार्थ्यांच्या कार्याचे ही कौतुक केले.
स्पर्धा निकाल –
*साई फुटबॉल अकॅडमी*
विजेता संघ १००००/- रुपये रोख, करंडक आणि सर्व विजेत्या संघांमधील खेळाडूंना मेडल्स..!
*चेतक फुटबॉल क्लब*
उपविजेता संघ ७०००/- रुपये रोख, करंडक आणि सर्व उपविजेत्या संघामधील खेळाडूंना मेडल्स..!!
शिस्तबद्ध संघ – करंडक
*नाझ फुटबॉल क्लब*
*बेस्ट स्ट्रायकर* – आर्या जठार (साई एफए)
*बेस्ट डीफेंडर* – कौस्तुभ मोडक (टायगर कंम्बाईन)
*बेस्ट गोलकीपर* – सिध्दार्थ देसाई (साई एफए)