माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचा स्थापना सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.मात्र त्यापूर्वीच शहरातील अनेक भागात “आठवतय का ?” या शीर्षकाच्या माध्यमांतूनमधून शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या नेत्यांना लक्ष करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहे.या फ्लेक्सबाजीची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
शहरात फ्लेक्सच्या माध्यमांतून सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले.त्या फ्लेक्सवर मजकूर खालील प्रमाणे
@ आठवतंय का ? धनगर बांधवांशी गद्दारी
तेव्हा, आमची सत्ता आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला एस. टी. मध्ये आरक्षण देणार : देवेंद्र फडणवीस 2013, आता
10 वर्षे होऊन देखील धनगर समाजाला एस. टी. मधून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने करावे लागत आहे. अशी फसवणूक नको असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ला मत द्या!
@ आठवतंय का ? सत्तेसाठी विचारांशी गद्दारी
तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे : ” काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही, वेळ पडली तर मी माझी शिवसेना बंद करेल पण काँग्रेस सोबत जाणार नाही. ”
आता उद्धव बाळासाहेब ठाकरे ” मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस सोबत जाऊन आपल्या वडिलांच्या विचारधारेला मातीत घातले, हिंदुत्व सोडून टाकले ” अशी फसवणूक नको असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ला मत द्या!
@ आठवतंय का ? हिंदुत्ववादी विचारधारेशी गद्दारी, निवडणुकीपूर्वी २०१९ ची विधानसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा – शिवसेनेने युती करून लढवली होती. महाराष्ट्राच्या जनतेने याच युतीला कौल दिला होता.
निवडणुकीनंतर, हिंदुत्वाला’ रामराम’ करून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी च्या अजित पवार यांच्या सोबत ७२ तासांचे सरकार स्थापन केले होते. त्या नंतर हिंदुत्ववादी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते.अशी फसवणूक नको असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ला मत द्या!
@ आठवतंय का ? सत्तेसाठी मारलेली पलटी,
१९९८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वी ” इटलीच्या बाईच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकत नाही. आम्ही काँग्रेस च्या बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन करत आहोत : शरद पवार
@ आठवतंय का ? मुख्यमंत्रीपदासाठी भूमिका बदलली, 2018 मध्ये ” माझ्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भाजपसोबत मी मांडीला मांडी लावून सत्तेत बसू शकत नाही, म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देतो” : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2022 मध्ये ” सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करून मुख्यमंत्री पदासाठी त्याच भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन केली.अशी फसवणूक नको असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ला मत द्या!
@ आठवतंय का ? महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी
तेव्हा आमची सत्ता आल्यास भ्रष्टाचारी अजित पवार यांना तुरुंगात टाकू…… अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ! देवेंद्र फडणवीस