मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राजभवन येथे आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे आदी उपस्थित होते.
यावेळी दीपक केसरकर म्हणाले की,केसरकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे ही कायदेशीर तरतूद असते, त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे आणि आता ते काळजीवाहू मुख्यमत्री झाले आहेत. दिल्लीतले निरीक्षक म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येतील, राज्यातील आमच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय वरिष्ठांवर (मोदी-शाह) सोपवला आहे. यावर सर्वांचं एकमत आहे. वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल,अशी भूमिका त्यांनी मांडली.