शाही अभ्यंगस्नान, फराळ, फाट्याकांचा आनंद घेत रस्त्यावरील मुलांची दिवाळी झाली गोड

0
21

विनाखंड सलग १७ वर्षे श्री आबा बागुल यांच्या या उपक्रमाचा गौरव

रस्त्यावरील व सिग्नल वरील गरीब मुलांना दिवाळी सणाचा आनंद देणारा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आनंद सोहळा गुरुवारी सकाळी सारसबाग येथे पार पडला. याचे आयोजक होते ते श्री आबा बागुल. शाही अभ्यंगस्नान, फराळ, फाट्याकांची आतिषबाजी आणि नवीन कपडे यामुळे उपस्थित मुले अक्षरशः नाचू लागली.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री आबा बागुल यांनी केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम राबविला नसून, गेली १७ वर्षे तो सातत्याने राबवित आहेत. ज्यांना दोन वेळचे अन्य वेळेवर मिळत नाही, त्यांना दिवाळीत स्वतःच्या हाताने शाही अभ्यंगस्नान घालून नवीन कपडे देऊन व दिवाळीचा फराळ देत त्यांची दिवाळी गोड केली.


सारबाग येथील आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आजचा नरक चतुर्थीचा सोहळा पार पडला. उटणे, मोती साबण याने नाहून ही मुले आबांच्या जवळ येउनच बिलगली. यावेळी त्यांना मिठाई देऊन त्यांना फटाके देण्यात आले. या फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वतः आबा सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करीत होते. यावेळी या गरीब मुलांचे पालकही भारावून गेले. यावेळी विश्वास दिघे, संतोष गिले, साई कसबे, गोरख मरळ, मनीषा गायकवाड, जयश्री बागुल, हर्षदा बागुल, इम्तियाज तांबोळी, अशोक नेटके, जयकुमार ठोंबरे, अमित बागुल आदी उपस्थित होते.
पुणे नवरात्र महोत्सवाअंतर्गत गेली १७ वर्षे नेहमीच पुणे शहरात काय पण महाराष्ट्रात नावाजलेल्या श्री आबा बागुल यांनी काशी यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे, महापालिकेच्या हाती जे जमले नाही अशो राजीव गांधी ई लर्निंग शाळा सुरू करून पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात एक आदर्श उभा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here