महिला भगिनींना रोजच्या कामातून विसावा मिळावा, विरंगुळा व्हावा, कलागुणांसाठी व्यासपीठ मिळावं हा हेतू ठेऊन मा. नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक १० कोथरूड बावधन मधील महिला भगिनिंसाठी आयोजित करण्यात आला होता. स्वा. वि. दा. सावरकर मैदान, उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड डेपो येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात बालगायिका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त पणे सहभागी होत बक्षीसांची लयलूट केली.
यात वनिताताई संजय कावडवार ई बाईक, मनीषाताई त्रिगुणे फ्रिज, जनाबाई ज्ञानेश्वर काळे शिलाई मशीन, अनिताताई सर्जेराव कदम यांनी पीठ गिरणी, दिपालीताई राजेंद्र भरम यांनी टिव्ही ही बक्षीसे जिंकली. तसेच १०० महिलांना पैठणी भेट देण्यात आली.