महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांच्या रॅलीची शहरात चर्चा
पिंपरी विधानसभा मतदार संघात परिवर्तन महाशक्तीमधील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, विशेष म्हणजे ओव्हाळ यांनी चक्क 100 हुन अधिक घोडेस्वार कार्यकर्ते सोबत घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ते चर्चेचा विषय ठरलेत.
मतदार संघातील रस्त्यांची दुरवस्था इंधनाचे वाढलेले दर बघता असा घोड्यावरून प्रवास करत आपण उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीच्या युद्धात पिंपरीचा गड आपणच काबीज करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आमच्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले स्वराज्य आणायचे आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ते नक्की येणार याची आम्हाला खात्री आहे, असेही ओव्हाळ म्हणालेत.